क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Drug News : अंमली पदार्थांचा ‘कप सिरफ’ तस्कर जेरबंद! 15 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाखाचा दंडाची कठोर शिक्षा

Mumbai Police Latest Drug News : 14 लाखांहून अधिक किमतीच्या 7040 बॉटल्स जप्त; मुंबई पोलीस अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई

मुंबई :- बृहन्मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) मोठी मोहिम फत्ते करत, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मा. विशेष सत्र न्यायालयात कठोर शिक्षा मिळवून दिली आहे. न्यायालयाने आरोपीला तब्बल 15 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. Mumbai Latest Crime News

हातावर होता 14 लाखांचा अंमली साठा

आरोपी शाकीर मोहम्मद हुसेन रेतीवाला (वय 55) या कपड्याच्या व्यापाऱ्याला चेंबूर परिसरातील नाना टायर सर्वीस समोरील फुटपाथवर अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून कोडेन फॉस्फेट (Codeine Phosphate) हा अंमली पदार्थ मिश्रित कप सिरफच्या एकूण 7040 बॉटल्स जप्त करण्यात आल्या होत्या. या साठ्याची किंमत अंदाजे 14 लाख 08 हजार रुपये इतकी होती.

न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

घाटकोपर युनिटच्या Ghatkopar Unit अंमली पदार्थ विरोधी कक्षाने याप्रकरणी कौशल्याने तपास करून वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर विशेष सत्र न्यायालयाने सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून आरोपी शाकीर रेतीवाला याला 15 वर्षे सक्तमजुरीच्या कारावासाची आणि 1 लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणारे अधिकारी

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष नवनाथ ढवळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली.

या कारवाईत तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक सशांक शेळके, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल खैरे, फिर्यादी पोलीस हवालदार शरद देवाजी यादव तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार संजय सुर्यवंशी, पोलीस हवालदार हेमत गोरे, महिला पोलीस शिपाई चांदनी कोर्टबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.बृहन्मुंबई पोलीस अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0