Navi Mumbai Robbery News : वाशी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू; सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे,शटर उचकटून दुकानात घुसखोरी
नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी Navi Mumbai परिसरातील उच्चभ्रू मद्य विक्री करणाऱ्या “व्ही फाय लिव्हिंग लिक्विड्स” वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून धाडसी चोरी केली आहे. या चोरीत तब्बल 17 लाख 38 हजार 588 रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या आणि 20 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. एकूण चोरीचा आकडा 17 लाख 58 हजार 588 रुपये इतका असून वाशी पोलीस ठाण्यात Vashi Police Station अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Latest Crime News
ही घटना वाशी गावातील सिद्धिविनायक इमारतीत असलेल्या नामांकित वाईन शॉपमध्ये घडली. 10 जुलै रोजी रात्री दुकान बंद करताना व्यवस्थापक आणि रोखपालाने नियमितप्रमाणे हिशोब पूर्ण करून दुकान बंद केलं होतं. मात्र 11 जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यास आल्यानंतर शटर उचकटलेलं आणि आतील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले.
दुकानाच्या गल्ल्यातील 20 हजार रुपयांची रोकड गायब होती, आणि महागड्या मद्याच्या 107 बाटल्या चोरीस गेल्याचं ऑडिट दरम्यान निष्पन्न झालं. त्या बाटल्यांची एकूण किंमत तब्बल 17.38 लाख रुपये आहे.
घटनेनंतर व्यवस्थापनाकडून इन्व्हेंटरी ऑडिट करून खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर अधिकृत तक्रार वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
वाशी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फूटेज व आसपासच्या परिसरातील हालचालींची तपासणी केली जात आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून विशेष कौशल्याने ही चोरी केल्याने, हे स्थानिक गुन्हेगारांचे टोळीगत कृत्य असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…