Domestic Violence Fir on NRI | पत्नीचा छळ केल्याप्रकरणी NRI पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
पुणे, दि. ६ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Domestic Violence Fir on NRI
पत्नीचा शाररिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तसेच आर्थिक नुकसान करत कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Domestic Violence Fir on NRI
याबाबत पत्नीने Pune Police स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या संशयित चंद्रशेखर बबनराव महाले, बबनराव तात्या महाले, हेमलता बबनराव महाले (रा. 1. चंडलर, अॅरिझोना, अमेरिका) आणि नामदेव पवार (रा. स्वारगेट) अशी गुन्हा दाखल व्यक्तींची नावे आहेत. Domestic Violence Fir on NRI
अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा विवाह २००५ मध्ये चंद्रशेखर यांच्याशी झाला. महिला तक्रारदार या भारतात व लग्नानंतर अमेरिकेत America काही काळ मॅनेजमेंट कन्सल्टंट होत्या, तर पती चंद्रशेखर आयटी अभियंता. त्यांनी २००६ मध्ये पुण्यातील सॅलिसबरी पार्कमध्ये दोघांच्या नावे सदनिका विकत घेतली. फेब्रुवारी २००६ नंतर त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. एक वर्षानंतर पतीने फिर्यादी महिलेला घराच्या कामानिमित्त पुण्यात पाठविले. घराच्या कामानिमित्त गुंतवून करिअरचे नुकसान केले. तसेच, शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात २८ डिसेंबर २०१७ रोजी पतीविरुद्ध गुन्हा दाखल आहे.