
Dombivli Latest Crime News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांची उत्कृष्ट कामगिरी, नववर्षात पोलिस विभागाचे कौतुकास्पद कार्य
डोंबिवली :- नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर गणरायाचे दर्शन जात असताना गणपती मंदिर मनपाडा ते डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षातून प्रवास करताना रिक्षात विसलेले सोन्याचे दागिने आणि कपडे असल्याची बॅग काही तासांत डोंबिवली पूर्व पोलीस Dombivli Police Staion ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड आणि त्यांच्या पथकाने परत मिळवून दिली आहे. या कामगिरीबाबत अश्विनी अजय किर्पेकर या महिलेने आभार व्यक्त केले तर वरिष्ठांकडून या कामगिरीबाबत कौतुक होत आहे.


1 जानेवारीला सकाळच्या सुमारास डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अश्विनी अजय किर्पेकर (47 वय रा. एमआयडीसी फेस-2 डोंबिवली पूर्व) या गणपती मंदिर मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्थानक येथे रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांच्या जवळील बॅग रिक्षामध्ये विसरल्यात. त्या बॅगेमध्ये मौल्यवान 22 तोळे 400 मिली. 18 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच कपडे असल्याचे डोंबिवली पूर्व पोलीस ठाण्यात कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डोंबिवली पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोलीस अंमलदार मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कक्षाच्या मदतीने हद्दीतील सर्वच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचा तपास घेतला. रिक्षा मालकाशी संपर्क साधून पोलिसांनी महिलेची बॅग शोधून देण्यास मदत केली आहे. पोलिसाच्या या कामगिरीनंतर नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी दमदार कामगिरीमुळे पोलिसांचं सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.