Dombivli Tadipar News : मनाई आदेश भंग करणाऱ्या, दोन तडीपार आरोपींना अटक..
•Dombivli Tadipar News तडीपार आरोपी डोंबिवलीच्या वेगवेगळ्या झोपडपट्टीतून अटक, डोंबिवली पोलिसांची कारवाई, आरोपी गजाआड
डोंबिवली :- ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता आणि कुख्यात गुंडे आणि गुंडे प्रवृत्ती असलेल्या आरोपींना अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहे. Straightforward and Benefit-Driven: “Police Action in Dombivli: Criminals Taken Down, Residents Breathe Easy” पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई करत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, बेकायदेशीर अवैधरित्या धंदे करणारे, सर्व आरोपींना अटक करण्याचा धाडसत्र चालू केले आहे. डोंबिवली पोलीस ठाणे यांनी एकाच दिवशी दोन तडीपार आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना डोंबिवलीच्या वेगवेगळ्या झोपडपट्टीच्या परिसरातून अटक केली असून हे दोन्ही आरोपी तडीपार असून त्यांच्या तडीपार कालावधी समाप्त होण्यापूर्वीच शहरात प्रवेश केला आहे. अशा मनाई आदेश भंग करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दोन तडीपार आरोपींना एकाच परिसरातून अटक
मनाई आदेश भंग करणारे आरोपी दिनेश दिनकर कदम (48 वर्ष) याला पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 यांनी गंभीर गुन्हेचा आरोप असलेल्या आरोपीला 18 एप्रिल 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे,अंबरनाथ,उल्हासनगर या तालुक्यातून 18 महिन्याच्या कालावधी करीता हद्दपार करण्यात आले होते. तसेच,गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे (22 वर्ष) यालाही 6 जून 2023 रोजी 18 महिन्याच्या कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातूनच हद्दपार करण्यात आले होते.हद्दपारचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आरोपी कदम आणि आहिरे यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात वावर करत होता. गुन्हे शाखा-3 यांना मिळालेले गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे डोंबिवलीच्या इंदिरानगर झोपडपट्टीच्या परिसरात आल्याचे कळाले पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली असून, सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीआरपीसी 41 (अ) (1) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काते हे करत आहेत.