क्राईम न्यूजमुंबई

Dombivli Tadipar News : 18 महिन्यांकरिता तडीपार केलेल्या आरोपीला अटक

Dombivli Latest Tadipar News: तडीपारचे नियमन उंल्लघन करून बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कल्याण मधून अटक केली आहे

डोंबिवली :- ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून 18 महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार Dombivli Tadipar Criminal केलेल्या एका आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक Manpada Police Station केली आहे. तडीपार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीर रित्या हत्यार वापरल्या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी आरोपी मनीष उमाशंकर चौहान (33 वर्ष रा. पिसवली) याला अटक केली आहे. Dombivli Latest Crime News

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष चौहान या तडीपार आरोपीला शनिवारी रात्रीच्या सुमारास पिसवली कल्याण पूर्व बेकायदेशीर कोयता बाळगल्या प्रकरणी आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, कल्याण यांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून 18 महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केले होते. परंतु तडीपार नियमाचे उल्लंघन करून मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ‌4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खिल्लारे करत आहेत.. Dombivli Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0