Dombivli Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, आर्थिक नफ्याच्या आमिषाला बळी
Dombivli Share Market Fraud News : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी या ॲप मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळणार..
डोंबिवली :- खंबाळपाडा डोंबिवली Dombivli पूर्व येथे राहणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेला शेअर मार्केटमध्ये Invet In Share Market गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे आमिष दाखविले होते. त्यानंतर 19 लाखाहून अधिक किंमतीचे गुंतवणूक केली होती परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार टिळक नगर पोलीस Tilak Nagar Police News ठाण्यात दाखल केली आहे. गुंतवलेले रक्कमेवर मोठ्या प्रमाणावर अधिकचा परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. Dombivli Share Market Fraud News
19 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक
महिलेला व्हाट्सअप वर मेसेज करून Aiammax हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळाल्याचे आमिष महिलेला दाखविले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने त्यांच्याकडील एकूण 19 लाख 84 हजार 821 रुपये रक्कम ऑनलाईन गुंतवणूक केली होती. परंतु ऑनलाईन घेतलेली रक्कम परत न मिळाल्यामुळे, आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी डोंबिवलीच्या टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड),66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करत आहे. Dombivli Share Market Fraud News