क्राईम न्यूजमुंबई

Dombivli Robbery News : डोंबिवली : दोन व्यक्तींना दिवसाढवळ्या लुटले..

Dombivli Robbery News : बोलण्यात गुंतवून दोन व्यक्तींना डोंबिवलीत तीन लाखाहून अधिक किंमतीचा गंडा, सोन्याच्या वस्तू, रोख रक्कम, घड्याळ चोरट्याने लंपास केले

डोंबिवली :- शहरामध्ये उभ्या उभ्या दिवसाढवळ्या लोकांना गंडा घालणाऱ्या टोळ्या सक्रिय Dombivli Robbery News झाल्या आहे. अनेक दिवसांपूर्वी हिग्नोटाइजच्या रूपाने चोरीचा प्रकार वाढला होता. अशीच घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे.बोलण्यात गुंतवून शरीरावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आणि घड्याळ असा ऐवज चोरटे घेऊन लंपास झाले आहे. “Extorting two persons worth more than three lakhs in Dombivli by engaging them in talking.”

डोंबिवली पूर्व गुप्ते रोड येथे राहणारे वामन राजाराम जाधव (69 वर्ष), आणि साक्षीदार जगदीश मिठाबाई आचरेकर यांना 28 जून च्या दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास दिवसाढवळ्या बोलण्यात गुंतवून तीन लाख 16 हजार किमतीचे सोन्याची चैन, अंगठी, ब्रेसलेट आणि रोख रक्कम काढून चोरट्यांनी फसवणूक केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या घटनेविरुद्ध जाधव यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात फिर्यादी देत अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार केली आहे. जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काते हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0