क्राईम न्यूज

Dombivli Marriage Scam : डोंबिवलीत लग्नाच्या आमिषाने तरुणीला 10 लाखांचा गंडा; नेदरलॅंडच्या ‘संजय भरल’ने भेटवस्तूंच्या नावाखाली लुटले

Dombivli Latest Marriage Scam News : मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात; कुरियर चार्जेस आणि कस्टमच्या नावाने टोळीने उकळले पैसे

डोंबिवली | विवाहासाठी सुयोग्य वराच्या शोधात असलेल्या डोंबिवलीतील एका 33 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीची सायबर भामट्यांच्या टोळीने 10 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ‘शादी डॉट कॉम’ या प्रसिद्ध विवाह संकेतस्थळावरून सुरू झालेली ही ओळख एका मोठ्या आर्थिक फसवणुकीत रूपांतरित झाली असून, याप्रप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसाच्या ‘गिफ्ट’चा असा रचला सापळा

डोंबिवलीतील आयरे रोड परिसरात राहणारी ही तरुणी मुंबईत बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख स्वतःला नेदरलॅंडमध्ये स्थायिक असलेला ‘कन्नड ब्राह्मण’ सांगणाऱ्या संजय भरल या तरुणाशी झाली. दोघांचे व्हॉट्सॲपवर बोलणे सुरू झाले आणि लवकरच लग्नाचे स्वप्न दाखवण्यात आले. या तरुणीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजयने तिला नेदरलॅंडहून सोने आणि महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले.

टप्प्याटप्प्याने उकळली 10 लाखांची रक्कम

भेटवस्तूंचे पार्सल भारतात आल्याचे भासवून कुरियर कंपनीच्या नावाने या तरुणीला फोन येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कुरियर शुल्क म्हणून 32 हजार रुपये, त्यानंतर कायदेशीर शुल्क, बँक ट्रान्सफर आणि सोन्याचे डिटेंशन चार्जेस अशा विविध कारणांसाठी दीड लाख ते साडेतीन लाखांपर्यंतच्या रकमा भरण्यास तिला भाग पाडले गेले. सोन्याच्या दागिन्यांच्या आमिषाने तरुणीने वेळोवेळी एकूण 10 लाख 29 हजार रुपये भामट्यांच्या खात्यात जमा केले.

असा उघड झाला बनाव

रक्कम उकळण्याचा प्रकार थांबत नसल्याने तरुणी त्रस्त झाली होती. दरम्यान, संजयने आपण दिल्ली विमानतळावर पोहोचलो असून सुरक्षा विभागाने पकडले आहे, असे सांगून आणखी 85 हजार रुपयांची मागणी केली. संशय आल्याने तरुणीने संजयचा व्हॉट्सॲप नंबर ब्लॉक केला. त्यानंतर काही वेळातच कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याने तिला फोन करून “संजय तुम्हाला भेटायला दिल्लीत आला आहे, तुम्ही त्याला ब्लॉक का केले?” असे विचारले. नेदरलॅंडहून आलेल्या संजयबद्दल कुरियर कंपनीला माहिती कशी मिळाली, या प्रश्नाने तरुणीची खात्री पटली की ही एक संघटित फसवणूक आहे.

पोलिसांत धाव

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणातील ‘संजय भरल’ आणि कुरियर कंपनीच्या नावाखाली फोन करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

52 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago