क्राईम न्यूज

Dombivli Crime News : डोंबिवलीत खून ; वडिलांनीच केली मुलाची हत्या

Dombivli Latest Crime News : वडिलांकडे दारूसाठी मुलगा मागत होता पैसे, वडिलांचा राग अनावर मुलाची केली हत्या

डोंबिवली :- वडील आणि मुलाचे नाते हे जगाला फार काही सांगून जात असतात. परंतु वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दारू पिण्यासाठी मुलगा रोज पैसे मागत असल्याने हा राग अनावर झाला या रागात वडिलांनी मुलाच्या डोक्यात लाकडी मारून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची घटना समोर आली आहे. (In Dombivli Dad killed His Own Son)

आरोपी अभिमन्यु गणपत पाटील, (65 वर्षे) मजूरी‌ करतात, रा.डोंबिवली पश्चिम याने त्याचा मुलगा हरेश अभिमन्यु पाटील, (30 वर्षे) हा नेहमी दारू पिण्यासाठी मारहाण करून पैसे मागतो या गोष्टीचा राग मनात धरून, 23 एप्रिल रोजी रात्री 10.30 वा.चे सुमारास, सरोवरनगर, डोंबिवली पश्चिम येथे, त्याचा मुलगा हरेश अभिमन्यु पाटील याचे डोक्यात लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी करून त्यांस जिवे ठार मारले आहे. प्रकाराबाबत पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि कलम 302,203 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गमे हे करीत आहेत. Dombivli Crime News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago