Dombivli Crime News : डोंबिवलीत खून ; वडिलांनीच केली मुलाची हत्या
Dombivli Latest Crime News : वडिलांकडे दारूसाठी मुलगा मागत होता पैसे, वडिलांचा राग अनावर मुलाची केली हत्या
डोंबिवली :- वडील आणि मुलाचे नाते हे जगाला फार काही सांगून जात असतात. परंतु वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दारू पिण्यासाठी मुलगा रोज पैसे मागत असल्याने हा राग अनावर झाला या रागात वडिलांनी मुलाच्या डोक्यात लाकडी मारून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची घटना समोर आली आहे. (In Dombivli Dad killed His Own Son)
आरोपी अभिमन्यु गणपत पाटील, (65 वर्षे) मजूरी करतात, रा.डोंबिवली पश्चिम याने त्याचा मुलगा हरेश अभिमन्यु पाटील, (30 वर्षे) हा नेहमी दारू पिण्यासाठी मारहाण करून पैसे मागतो या गोष्टीचा राग मनात धरून, 23 एप्रिल रोजी रात्री 10.30 वा.चे सुमारास, सरोवरनगर, डोंबिवली पश्चिम येथे, त्याचा मुलगा हरेश अभिमन्यु पाटील याचे डोक्यात लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी करून त्यांस जिवे ठार मारले आहे. प्रकाराबाबत पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि कलम 302,203 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गमे हे करीत आहेत. Dombivli Crime News