मुंबई

Dombivli Fire : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कारखान्याला आग, जीवितहानी नाही

•डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पुन्हा एकादा कारखान्याला आग, जीवितहानी नाही, पंधरा दिवसात दुसरी घटना

डोंबिवली :- डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील पंधरा दिवसात ही दुसरी घटना आहे एका कंपनीला भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरत आहेत. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागलीय, याची माहिती समोर आलेली नाही.

23 मे रोजी डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या. वाहनांचं देखील मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू तर 55 जण जखमी झाले होते.कंपनीचा मालक मलय मेहताला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0