Dombivli FedEx Scam : हॅलो… FedEx कुरियर मधून बोलत आहे, तुमच्या पार्सल मध्ये 120 ग्रॅम मेफोड्रॉन पावडर असल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक
Dombivli FedEx Scam : मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
डोंबिवली :- हॅलो.. FedEx कुरियर्स मधून बोलत असून तुमचे पार्सल आले आहे Dombivali FedEx Scam आणि त्या पार्सल मध्ये 120 ग्रॅम मेफोड्रॉन पावडर असल्याचे सांगून एका ज्येष्ठ व्यक्तीची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची Online courier scam तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station दाखल करण्यात आली आहे. ऑनलाइन फसवणुकीमध्ये काही दिवसांपासून फेडेक्स कुरियर नावाने फसवणुकीची घटना वाढत आहे. Dombivali FedEx Scam
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वोदय पार्क डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या सुधीर गंगाधर गर्गे (62 वर्ष) या सेवानिवृत्त व्यक्तीची फेडेक्स कुरियर च्या नावाखाली अकरा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियमानाच्या कलमाखाली अज्ञात आरोपींवर तक्रार दाखल केली आहे.गर्गे यांना दोन व्यक्तींनी कॉल करून फेडेक्स मधून बोलत असल्याचे सांगून तुमचे पार्सल आले आहे. त्या पार्सल मध्ये पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, चार किलो कपडे, 120 ग्रॅम मेफोड्रॉन पावडर आणि लॅपटॉप असे सामान आहे तसेच पार्सल चा नंबर सांगून पार्सल करीता एकूण 11 लाख 50 हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले होते. ती रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे हे करत आहे. Dombivali FedEx Scam