डोंबिवली : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक
Dombivili Crime News : बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल आणि एक राऊंड पोलिसांनी जप्त केले आहे
डोंबिवली :- बेकायदेशीररित्या पिस्तूल Illegal Weapon Use In Dombivli बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी Dombivli Police एका आरोपीला अटक केली आहे. मानपाडा पोलिसांनी Manpada Police Station सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.शहरात गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी स्थानिक पोलीसांसह गुन्हे शाखा हद्दीत गस्त घालत होते. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ, पोलीस शिपाई मोकाते, यांच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या खास बातमीदारकडून माहिती मिळाली होती की, सागाव,वुड हाऊस डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समोर डोंबिवली पूर्व येथे एक जणाकडे बेकायदेशीर हत्यार जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Dombivli Latest Crime News
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सागाव वूड हाऊस डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समोरुन एका तरुणाला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याच्या जवळील एक पिस्तूल, एक राऊंड जप्त केल्या असून पोलिसांनी आरोपीचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव नरेश कांतीलाल सोनी (32 वर्ष, डोंबिवली पूर्व) सांगितले. मानपाडा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून, गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ हे करत आहे. Dombivli Latest Crime News