Dombivli Crime News : कल्याणमधून पती-पत्नी असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
•अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
डोंबिवली :- मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत भारतात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाहीत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कल्याण पूर्वेत आडिवली भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी पती, पत्नीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी पथकाने अटक केली आहे. ते मागील अनेक वर्षापासून कल्याणमध्ये राहत होते. पोलिसांनी या माहितीची खात्री केल्यावर त्यांना दोन बांगलादेशी राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोन बांगलादेशींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठीचे पारपत्र, व्हिसा आणि नागरिकत्व कागदपत्रांची मागणी केली असता पोलिसांना ते एकही कागदपत्र देऊ शकले नाहीत.मोहंमद सबुज सनोवर हसन, (वय 24 रा. तिरूपती भवन पॅराडाईज बिल्डींग, आडिवली, रा. गाव शेखशिमल, ठाणा घटेल, जि.तंगेल, राज्य ढाक्का, देश बांगलादेश) त्याची पत्नी बिस्टी सबुज हसन (वय 24) पोलिसांनी या दोन जणांविरुध्द कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मानपाडा पोलीस ठाणे येथे पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4 विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13,14 (अ), 14 (ब), 14 (क) तसेच घर मालक आरोपी मुस्तफा मुंशी याने त्याचे मालकीचे घर आरोपी यांना ते बांगलादेशी आहेत. हे माहित असताना देखील भाडयाने दिले म्हणून त्याचेविरूध्द विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोन्ही बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी व त्यांचे पथकाने यशस्वीपणे पार पाडलेली आहे.