• Mysterious theft of 2 lakh rupees at gas agency in Dombivli डोंबिवलीच्या एच.पी गॅस एजन्सीमध्ये चोरी, रोकड लंपास, मॅनेजरची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
डोंबिवली :- डोंबिवली पूर्व येथील न्यू रिलॅक्स एच.पी. गॅस एजन्सीचा मागचा दरवाजा तोडून दोन लाख रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. डोंबिवली पूर्व येथे न्यू रिलॅक्स एच.पी. गॅस एजन्सी यांच्या कार्यालय आहे. Urgent police investigation after robbery at Dombivli gas agency 15 ऑगस्ट ला कामानिमित्त गॅस एजन्सीचे मॅनेजर रंजित सैहगल ऑफिस कडे आले असता त्यांना एजन्सीचा मागचा दरवाजा तोडून कोणीतरी ऑफिसमध्ये ठेवलेले रोकड लंपास केल्याची लक्षात आले त्यावरून त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथे असलेल्या न्यू रिलॅक्स एच.पी. गॅस एजन्सी येथे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रंजित सैहगल (44 वर्ष रा. पलावा डोंबिवली) यांनी एच.पी. गॅस एजन्सी मध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, गॅस एजन्सीच्या मागील दार कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून आत मध्ये प्रवेश केला एजन्सी मधील लाख रुपये रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. Urgent police investigation after robbery at Dombivli gas agency मॅनेजरचा सांगण्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305,331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…