Dombivli Tadipar News पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 सचिन गुंजाळ, यांनी आरोपींना अटक करण्याचे दिले निर्देश
डोंबिवली :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. तडीपार आरोपींना Tadipar Crminal शहरातून हद्दी पार केले असले तरी सर्रास पोलिसांचे परवानगी न घेता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वावरत असताना दिसत आहे.अशा तडीपार गुंडास ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 सचिन गुंजाळ DCP Sachin Gunjal यांनी आपल्या परिमंडळ हद्दीतील मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला डोंबिवली मधून अटक केली आहे. Thane Crime News
आरोपी अतुल ऊर्फ बाळु अडसूळ (30 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, डोंबिवली यांनी ठाणे,या महसुली हद्दीतुन 18 महिन्याच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 12 सप्टेंबर 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, डोंबिवली यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 7 एप्रिल रोजी रात्री 11.50 वा. चे सुमारास, इंद्रानगर झोपडपट्टी डोंबिवली येथे टिळक नगर पोलीस ठाण्याचे पथकास मिळुन आला. प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी अतुल, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत हे करीत आहेत. Thane Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…