क्राईम न्यूजमुंबई
Trending

Dombivli Crime News : ऑनलाइन फसवणूक ; टेलिग्राम वर टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा

Dombivli Crime News : डोंबिवलीत महिलेची ऑनलाईन फसवणूक, पाच लाखाहून अधिक गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक

डोंबिवली :- पोलिसांच्या सायबर Dombivli Cyber Crime विभागाकडून सातत्याने जाहीर नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाइन गुंतवणुकी करताना सत्यता पडताळणी आवश्यक्य आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे नागरिकांना आवाहन केले असतानाही नागरिक आर्थिक आमिषाला बळी पडण्याची घटना सातत्याने समोर येत आहे. डोंबिवली पश्चिम विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या Vishnu Nagar Police हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचे टेलिग्राम द्वारे Telegram Fraud फसवणूक झाल्याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात Vishnu Nagar Police दाखल करण्यात आली आहे. या महिलेचे जवळपास पाच लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक झाले आहे. Dombivli Crime News

महिलेला 21 मे ते 23 मे या दरम्यान मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने कॉल करून टेलिग्राम अँप वर टाक्स पूर्ण केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले होते.फिर्यादी महिला, (32 वर्षे) त्यानंतर आरोपीत याने त्याचे बॅक खातेवर एकुण 5 लाख 12 हजार रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गमे हे करीत आहेत. Dombivli Crime News

Web Title : Dombivli Crime News : Online Fraud ; More profit by completing tasks on Telegram

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0