Dombivli Crime News : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक
•Dombivli Share Market Crime News शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक सहा लाखांहून अधिक रुपयाचा गंडा
डोंबिवली :- शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवल्यास अधिकचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक झालेल्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे. सायबर विभाग आणि पोलिसांकडून सातत्याने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गुंतवणूक करताना त्याबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे कोणत्याही ॲप द्वारे ऑनलाईन गुंतवणूक करू नका अन्यथा फसवणुकीला बळी पडाल असे पोलिसांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या अजय प्रभाकर किरवे,(31 वर्षे) यांना अनोळखी मोबाईलवर अज्ञात महिलेने व्हॉट्स ॲपवर मॅसेज करून स्टॉक मार्केटची माहिती दिली. तसेच क्लासरूम ॲपची लिंक पाठवून ते डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर ॲपमध्ये एकुण 6 लाख 55 हजार 700 रुपये ऑनलाईन वळते करण्यास सांगुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हे करीत आहेत.