Dombivli Crime News : शिपिंग कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक
•Dombivli Crime News चार लाखाहून अधिक किंमतीचा आर्थिक गंडा, पोलीस क्लियरन्स मिळवण्यासाठी पैशांची केली मागणी
डोंबिवली :- हॅलो.. शिपिंग कंपनीतून बोलत आहे असे सांगून तुमचे इराण येथे जात असलेले पार्सल त्याला पोलीस क्लिरियस मिळवण्यासाठी ऑनलाईन चार लाखाहून अधिक किंमतीची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. रामणा यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानुगंटी वेंकटा साई रमणा (26 वर्ष), हे डोंबिवली पूर्वेला असलेल्या पलावा सिटी येथे राहत आहे. त्यांनी इराण येथे एक पार्सल पाठवले होते. ते पार्सल पाठविल्यानंतर त्यांना अज्ञात व्यक्तीचा शिपिंग कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून इराण येथे पाठवले जात असलेले पार्सल पोलीस क्लियरन्स मिळवण्यासाठी चार लाख 90 हजार 142 रुपये ऑनलाईन बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रमणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहे.