Dombivli Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेची 32 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक
•ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये नफ्याचं दाखवलं आमिष; महिलेची 32 लाखांचे गंडा
डोंबिवली :- सायबर गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता शेअर ट्रेडिंगच्या नावाने नागरिकांची बँक खाते रिकामी केली जात आहे. बनावट एप्लीकेशन आणि व्हाट्सअप , इंस्टाग्राम, टेलिग्राम ग्रुप तयार करून टीप आणि नफा देण्याची आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडले जाते. डोंबिवली येथे राहणाऱ्या एका तीस वर्षे महिलेची अशीच एक फसवणूक शेअर मार्केटच्या नावाखाली झाली आहे. तब्बल 32 लाख रुपयाची महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तीस वर्षे महिलेला एका व्यक्तीने instagram वर मेसेज पाठवून शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेण्यासाठी एक लिंक पाठवली. त्यानंतर आरोपी यांनी महिलेला लिंक शेअर करत खरेदी करण्यासाठी एकूण 32 लाख 76 हजार 522 रुपये रक्कम ऑनलाइन घेऊन त्याचे आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने त्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आणण्यात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे हे करत आहे.