Dombivli Ganpati Fraud Case :मूर्ती वेळेत न मिळाल्याने गणेशभक्त संतप्त; कारखान्यातून मूर्ती पळवून नेल्या, नंतर मूर्तीकार स्वतःच पोलिसांपुढे हजर
डोंबिवली :- गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी गणपती मूर्ती वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या काही गणेशभक्तांनी मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. या मारहाणीच्या भीतीने तांबडे आपल्या कारखान्यातील कारागिरांसह रात्रीच पळून गेले. यामुळे संतापलेल्या भक्तांनी त्यांच्या ‘आनंदी कला केंद्र’ या कारखान्यातील मूर्ती पळवून नेल्या. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, तांबडे स्वतःच पोलिसांपुढे हजर झाले असून, त्यांनी मारहाणीच्या भीतीमुळे पळून गेल्याची कबुली दिली आहे. Ganpati Latest Crime News
नेमका प्रकार काय घडला?
गणपती मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच काही गणेशभक्त घाईघाईने मूर्ती घेण्यासाठी येऊ लागले. मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे यांनी सगळ्या मूर्ती वेळेत तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. तरीही काही भक्तांनी ‘गणेशोत्सव तोंडावर असताना अजूनही मूर्ती का तयार नाहीत?’ असा जाब विचारत त्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे तांबडे यांना आणखी मारहाण होण्याची भीती वाटली आणि ते रात्रीच्या वेळी आपला कारखाना उघडाच सोडून कारागिरांसह पळून गेले.
गणेशमूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांना कारखाना रिकामा दिसला आणि मूर्तीकार व कारागीर जागेवर नव्हते. फोन बंद असल्याने अनेक गणेशभक्त संतप्त झाले. ‘उद्या प्राणप्रतिष्ठा करायची, मूर्ती कुठून आणायची?’ या विचाराने हवालदिल झालेल्या भक्तांनी इतर कुणाची मूर्ती आहे याची पर्वा न करता कारखान्यातून उपलब्ध असलेल्या मूर्ती पळवून नेल्या. ज्यांच्या हाती काहीच लागले नाही, त्यांनी रागाच्या भरात कारखान्यातील रंगकाम करणाऱ्या मशिनी व इतर वस्तू उचलून नेल्या.मूर्तीकार स्वतःच पोलिसांसमोर हजर या प्रकारानंतर अनेक गणेशभक्तांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली.
पोलिसांनी तांबडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तांबडे साताऱ्याला त्यांच्या मूळगावी पळून गेले होते. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी साताऱ्याला जाणार असतानाच, दुसऱ्या दिवशी तांबडे स्वतःहून आपल्या आईसह पोलीस ठाण्यात हजर झाले.
पोलिसांना दिलेल्या जबाबात तांबडे यांनी, ‘काही गणेशभक्तांनी केलेल्या मारहाणीमुळे आणि हा प्रकार वाढण्याची भीती असल्याने आपण कारखाना सोडून गेलो,’ अशी कबुली दिली. त्यांनी ज्या भक्तांनी मूर्तीसाठी आगाऊ पैसे दिले होते, त्यांची नोंदणीची पावती दाखविल्यानंतर त्यांचे पैसे परत करण्याची तयारीही दर्शवली आहे. तांबडे आणि त्यांचे कारागीर अतिशय मेहनती असल्याचे अनेक भक्तांनी सांगितले. त्यांच्याकडे सुमारे साडेपाचशेहून अधिक गणपती मूर्तींची नोंदणी होती.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…