•शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक, टेक्निकल चोरांच्या संख्येत वाढ
डोंबिवली :- आधुनिक युगात जसजसे क्रांती होत आहे त्याचप्रमाणे चोरांच्या आधुनिकतेवर मध्येही वाढ होत आहे. टेक्निकल युगात आता चोरांकडून टेक्निकल फसवणूक होत आहे. ऑनलाइनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अडचणी फसवणूक होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून अधिकच्या नफाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये हिरो व्यक्तीचे जवळपास पाच लाख किंमतीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
प्रभाकर मलय्या भंडारी, (49 वर्षे), व्यवसाय-नोकरी, रा.चेरानगर, डोंबिवली पूर्व यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हाॅटस ॲपवर मॅसेज करून, स्टाॅक मार्केट मध्ये पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळण्याचे अमिष दाखविले. व त्यानंतर फिर्यादी यांना ALICE हे ॲप डाउनलोड करण्यास सांगुन त्यात स्टाॅक मार्केटचे नावे एकुण 5 लाख 88 हजार रूपये रक्कम विविध बॅंक खातेवर ऑनलाईन वळते करण्यास सांगुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…