Dombivli Crime News : मानपाडा पोलीसांची मोठी कामगिरी ; महिलेचे पैसे, मंगळसूत्रांनी हरवलेली पर्स शोधून काढण्यास यश..
•Dombivli Crime News पनवेल ते डोंबिवली प्रवासात महिलेची पर्स हरवल्याची तक्रार, पोलिसांकडून तांत्रिक मदतीच्या आधारे शोध…
डोंबिवली :- मानपाडा पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत एका महिलेची पैशाने आणि सोन्याच्या दागिनेने भरलेली पर्स हरवली होती. ती पर्स तांत्रिक मदतीद्वारे पोलिसांनी शोधून काढली आहे. आणि त्या महिलेला ती पर्स सुपूर्त केली आहे. कविता विक्रांत परब या डोंबिवलीच्या रेजन्सी आनंद संकुलात राहणाऱ्या महिला 30 मे 2024 रोजी पनवेल ते डोंबिवली असा कारने प्रवास करीत होते. त्यादरम्यान त्या महिलेची नकळतपणे पर्स पडल्याचे तक्रार महिलेने मानपाडा पोलिसांना दिली होती.
पोलिसांकडून स्विगी बॉयचा शोध..
कविता परब यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने पर्स शोधण्यास सुरुवात केली. महिला पनवेल ते डोंबिवली असा कारने प्रवास करत असताना विको नाका डोंबिवली पूर्व सुयोग हॉटेल जवळ नकळत कारमध्ये बसत असताना त्या महिलेची पर्स कार च्या सीट वरून खाली पडल्याचे तिने सांगितले होते. त्या पर्समध्ये साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, 11 हजार रोख रक्कम, आधार कार्ड पॅन कार्ड व इतर कागदपत्रे होते. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला असता पर्स पडल्यानंतर झोमॅटो कंपनीच्या एक कर्मचारी बाईकवरून येऊन ती पर्स उचलून तो तिथून निघून गेला असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने झोमॅटो कंपनीच्या माध्यमातून शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलिसांना स्विगी बॉय स्वप्निल राजू कोलार जो डोंबिवलीच्या दत्तनगर येथे राहत असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातील पर्स परत घेतले आहे. ती पर्स महिलेला परत मिळवून देण्यास पोलिसांना मोठे यश आले आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक गडदे पोलीस नाईक मंदार यादव, विकास माळी यांनी शोध घेऊन त्या स्विगी बॉय च्या ताब्यातील पर्स शोध घेऊन महिलेला सुपूर्त केले आहे.