मुंबई

Dombivli Crime News : व्हॉटस्‌ॲपवरील अनोळखी ग्रुपमध्ये ॲड करून शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक

•शेअर मार्केट मध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने 27.60 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

डोंबिवली :- ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. तसेच, व्हाट्सअप ग्रुप मध्ये ही ॲड करून फसवणूक करण्यात आली आहे. डोंबिवलीतील दीनदयाल रोड येथे राहणाऱ्या 42 वर्षीय गणेश मोहन सोरते यांची 27 लाख 56 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांनी शनिवारी दिली.

गणेश सोरते यांना 30 एप्रिल ते 22 जुलै 2024 या कालावधीत एका अनोळखी महिलेने कॉल करून Accel Student Group 55 या व्हाट्सअप च्या ग्रुपला ॲड करण्यात आले होते.ऑनलाईन शेअर मार्केट मधुन शेअर्स खरेदी केल्यास अधिक परतावा मिळेल, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून तक्रारदार यांच्याकडून वेगवेगळ्या ट्रेडिंग खात्यात 27 लाख 60 हजार रुपये भरण्यास सांगितले.त्यानंतर ही रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश यांनी या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिला आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जि एस गमे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0