•मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा : मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर, लाखोंचा गंडा
डोंबिवली :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून डोंबिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या संतोषकुमार गुप्ता (52 वर्ष) यांची एका सायबर भामट्याने 7 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.
डोंबिवलीतील रहिवासी गुप्ता यांना एप्रिल 2024 ते जुन 2024 या काळात एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर मॅसेज करून PL International, JM FGD, Federated Hermes यांचे व्हॉटस् ॲप ग्रुपला ॲड करून शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यासाठी https://www-paplist-com/h5 ही लिंक पाठवून त्यावर गुप्ता यांना 7 लाख 12 हजार इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. परंतु गुप्ता यांनी गुंतवलेली रक्कम परत न आल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात आले. या प्रकाराबाबत गुप्ता यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश भाबड हे अधिक तपास करीत आहेत.