Dombivli Crime News : फसवणूक ; दुबईचे बनावट दिनार चलन देऊन डोंबिवलीतील औषध विक्रेत्याची चार लाखांची फसवणूक
•दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसी भागातील एका औषध विक्रेत्याला भामट्यांनी 4 लाखांचा लावला चुना
डोंबिवली :- दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसीत राहणाऱ्या एका औषध विक्रेत्याने तीन भामट्यांकडून हे चलन आपल्या मित्रांच्या ओळखीने चार लाख रूपयांच्या भारतीय चलनात अदलाबदलीने एका बंद पिशवीतून ताब्यात घेतले. या व्यवहारानंतर औषध विक्रेत्याने पिशवीत पाहिले तर नोटांच्या आकाराची दिनार चलनाची पेपर रद्दीची कागदी पुडकी आढळून आली. व्यवहारानंतर तिन्ही भामटे पळून गेले. औषध विक्रेत्याने या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधा बी.एन.एस. कलम 318(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूपेंद्रनारायण बबन सिंग (51 वर्ष) असे औषध विक्रेत्याचे नाव आहे. ते डोंबिवली एमआयडीसीतील सुदामानगर भागात राहतात. औषध विक्रेता आहेत. पोलिसांनी सांगितले, भूपेंद्रनारायण सिंग यांचा मित्र रमेश जैस्वाल (38 वर्ष, रा. दावडी) यांनी गेल्या आठवड्यात सिंग यांना सांगितले. आपला एक मित्र रामअभिलाख महादेव पटेल (55 वर्ष रा. चक्कीनाका, कल्याण) याच्या ओळखीच्या तीन व्यक्ति आहेत. त्यांच्याकडे दुबईच्या आर्थिक व्यवहारातील 700 दिनार चलन आहे. ते हे चलन स्वस्तात देण्यास तयार आहेत. एक दिनारमागे ते 200 रूपये मागत आहेत. या एकूण दिनार चलनाची भारतीय बाजारातील किंमत 12 लाख होत आहे. पोलिसांनी माहिती दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा सर्वोत्तरी शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे निसर्ग हॉटेल खोणी पलावा परिसरात असल्याचे सांगितले.पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केला असता गुन्ह्याची कबुली केली असून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या साथीदाराच्या मदतीने फसवणूक केल्याचे कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सोहेल हसमुददीन शेख (30 वर्ष व्यवसाय कॅफे रा. नेवाळी नाका हनुमान मंदिर जवळ अंबरनाथ मुळ रा.जि. खजूरी नवी दिल्ली), मोहम्मद अबुबकर रज्जाक चौधरी (41 वर्ष व्यवसाय बिगारी रा. नेवाळी नाका हनुमान मंदिरजवळ,अंबरनाथ मुळगाव.खिलीमीस्ताव डालामिन उत्तर दिल्ली) यांना अटक करण्यांत आलेली असुन आरोपी यांचेकडुन 1 लाख 78 हजार रूपये रोख रक्कम, एक युनायटेड अरब अमिरात सेंट्रल बँक नावे असलेली शंभर रूपये किंमतीचे दिरम व दोन मोबाईल फोन असे जप्त करण्यांत आलेले आहे. आरोपी यांचा एक साथीदार याचा शोध घेण्यांत येत आहे. मानपाडा पोलीस ठाणेचा फसवणुक चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुहास हेमाडे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, शिरीष पाटील,सुनिल पवार,संजु मासाळ, विकास माळी, दिपक गडगे, निसार पिंजारी, पोलीस नाईक गणेश भोईर, प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे, रवि हासे, अशोक आहेर,विजय आव्हाड, पोलीस शिपाई महेद्र मंझा, नाना चव्हाण, घनश्याम ठाकुर यांचे पथकाने केलेली आहे.