क्राईम न्यूज

Dombivli Crime News : डोंबिवली पोलिसांची ‘मिशन मोबाईल’ यशस्वी! – विष्णुनगर पोलीस ठाण्याकडून 26 गहाळ मोबाईल नागरिकांना परत

Dombivli Police Seized Stolen Mobile : तांत्रिक माहितीच्या आधारे परराज्यातूनही शोध; हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांमध्ये समाधानाचे वातावरण; हवालदार रोहिदास शिंदे यांचा सन्मान

डोंबिवली :- डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात vishnu Nagar Police Station दाखल झालेल्या अनेक मोबाईल चोरी आणि गहाळ होण्याच्या तक्रारींचा विष्णुनगर पोलिसांनी यशस्वी तपास करत 26 मोबाईल परत मिळवले आहेत. मंगळवारी एका विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या हस्ते परत करण्यात आले. Dombivli Police Latest News

मागील काही महिन्यांच्या कालावधीत वाढलेल्या या तक्रारींची दखल घेऊन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी विशेष पोलीस पथक तयार करून तपास सुरू केला होता.

या पोलीस पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलमधील तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत हे मोबाईल विविध भागांतून, तसेच काही परराज्यातूनही हस्तगत केले.अशाप्रकारे एकूण 26 मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या सर्व मोबाईलची सत्यता पडताळून, तक्रारदार नागरिकांकडून त्यांची पुन्हा माहिती घेऊन ते मोबाईल परत केले. यावेळी आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने उपस्थित तक्रारदार नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

विशेष म्हणजे, या शोध कार्यादरम्यान विष्णुनगर पोलीस ठाण्यातील हवालदार रोहिदास शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांत एकूण 125 मोबाईल शोधून काढण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त हेमाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त हेमाडे यांनी नागरिकांना रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर टाळण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच, मोबाईल गहाळ किंवा चोरीला गेल्यास तात्काळ शासनाच्या ऑनलाइन माध्यमातून तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोपडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस ठाणे हद्दीतील गैरधंदे, श्रमपरिहाराचे अड्डे, गावठी दारू अड्डे आणि गांजा तस्करांवर नियमित कारवाई सुरू केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago