क्राईम न्यूज

Dombivli Crime News : डोंबिवलीत घरफोडी, चोरट्यांनी 2.94 लाखांचा ऐवज केला लंपास

Dombivli Crime News : बंद दरवाजाचा लॅच तोडून घरात प्रवेश करुन सोन्याचे-चांदीचे दागिन्यांचा ऐवज चोरुन नेला

डोंबिवली :- डोंबिवली निवासी भागातील बंद असलेल्या एका घरामध्ये चोरी Burglary in a house झाली असून चोरट्याने घरातील 2.94 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दिवसभरात घडली आहे. मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करुन सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांचा Gold Robbery News ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी निखिल कृष्णा पवार (33 वर्ष) यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात Vishnu Nagar Police Station चोरीचा तक्रार दाखल केली आहे. Dombivli Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 सप्टेंबरच्या दरम्यान निखिल पवार हे कामानिमित्त घराबाहेर गेले असता घरात कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर कपाटातील सोन्याचेक चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख 94 हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. निखिल यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी निखिल यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ),331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवारे हे करत आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago