मुंबई

Dombivli Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला..!!

•Dombivli Crime News पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला विष्णुनगर पोलिसांनी केले अटक, मुलाने वडिलांच्या विरोधात तक्रार

डोंबिवली :- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला करणारा पती गजाआड करण्यात आला आहे. चारित्र्याचे संशयावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून प्राणघातक हल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मुलाने वडिलांच्या विरोधात तक्रार देत विष्णूनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर ब्लेडने प्राणघातक हाल्ला

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. सचिन देव कोलते (53 वर्ष) हे आपल्या कुटुंबासह कैलास नगर डोंबिवली पूर्व येथे राहत होते. पत्नीच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेऊन मारहाण करत होता. रागाच्या भरात पतीने ब्लेडने पत्नीच्या मानेवर वार करून तिला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार चालू आहे. तसेच मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पती सचिन याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 109 (1),115 (2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमटकर हे करीत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago