मुंबई

Dombivli Crime News : बेकायदेशीररित्या शस्त्र ; गावठी कट्टासह सहा काडतुसे जवळ बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक

•Dombivli Crime News डोंबिवलीत बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा (बंदूक ) बाळगणाऱ्या तरुणाला अटक, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली :- बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तरुणाकडे एक गावठी कट्टा (बंदूक) सहा काडतुसे बेकायदेशीर रित्या जवळ असल्या प्रकरणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी करण्यात आली असून कुठे घातपात करण्याचा इरादा होता का याचा शोध पोलिसांकडून लावला जात आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे भात यांच्या पथकाला 18 जून रोजी रात्री 11.50 मि. सुमारास कल्याण रोड गोलवली डोंबिवली पूर्व येथे सापळा रचून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. पोलिसांनी तरुणाची अंगझडती घेतली असता त्या तरुणाकडे एक गावठी कट्टा (बंदूक) आणि सहा काडतुसे आढळून आले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीचे नाव अंकुश राजकुमार केशरवानी (25 वर्ष), असे असून पोलिसांनी त्याच्या जवळील गावठी कट्टा जप्त केला आहे. तसे त्याचा मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला असून पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील गुन्ह्याची तपासणी‌ सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात यांच्याकडून करण्यात येत आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts