Dombivli Crime News : भोंदू बाबाच्या नादात माजी नगरसेविकेच्य पतीचे अपहरण!
•मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; वीस लाखांची खंडणी मागणारे खंडणीखोर तुरुंगात
डोंबिवली :- ज्योतिष दाखविण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाच्या नादी लागून माझी नगरसेविका यांच्या पतीचे अपहरण झाले होते. तसेच खंडणीखोरांनी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मानपाडा पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत तीन खंडणीखोरांना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल एक जिवंत काडतुसे जप्त केली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काका ढाबा पाठीमागे, सखुबाई पाटील नगर कल्याण पूर्व येथे भाड्याने रूप घेऊन ज्योतिष दाखवण्याच्या बहाण्याने कट अजून माजी नगरसेविका यांचे पती यांचे अपहरण करून त्यांना बांधून ठेवून पिस्टल (गावठी कट्टा) दाखवून त्यांच्याकडून 20 लाख रुपयांचे खंडणी मागितली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309,126,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत तसेच आरोपींच्या वर्णनानुसार आरोपीचा शोध घेण्यात येत असताना गुन्हे प्रकटीकरण बदकाच मिळालेल्या बातमीवरून आरोपी हे कोळसेवाडी, तिसगाव नाका, चक्की नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.गिरीष रमेश खैरे,( 50 वय , रा.सप्तश्रृंगी बिल्डींगच्या बाजुला, शिवसेना ऑफिसच्यामागे, तिसगाव रोड, कल्याण पुर्व मु.जि. नाशिक, विनयकुमार कृष्ण यादव उर्फ राघव (22 वय रा. कल्याण फिरस्ता मुळ रा.उत्तरप्रदेश, विनायक किसन कराडे (35 वय वर्षे रा. तिसगावरोड, कोळसेवाडी,कल्याण पुर्व मु.पो मुर्तुजापुर अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
अपहरणाचा कट?
20 लाखाची खंडणी उकळण्याचा कट रचुन त्यासाठी गिरीष खैरे यांनी फिर्यादीचे अपहरण केल्यावर त्याला डांबुन ठेवण्यासाठी एका इमारतीत रूम भाडयाने घेवून, अडचणी ओळखीच्या ज्योतीषाकडे म्हणजेच आरोपी कराडे याच्याकडे गेल्यावर दुर होतील असा विश्वास फिर्यादीच्या मनात निर्माण करून, कट पुर्णत्वास नेण्यासाठी आरोपी विनयकुमार यादव याच्या बिहार येथुन गावठी कटटा आणण्यासाठी त्यास रूपये 15 हजार देवून गावठी कटटा आणल्यानंतर विनायक कराडे यास ज्योतीषी असल्याचा बहाणा करण्यास सांगुन आणि कट पुर्णात्वास नेण्यासाठी मिटींगा घेवून त्यानंतर दिनांक 24 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे आरोपी गिरीष खैरे याने फिर्यादी गुन्हयाच्या घटनास्थळी नेवून दोन्ही आरोपींच्या मदतीने खुर्चीला रस्सीने बांधुन फिर्यादी यांना गावठी कटटयाचा धाक दाखवून त्यांच्याकडुन रूपये 20 लाखांची मागणी करून फिर्यादी अंगावरील रोख रूपये 27 हजाराची आणि तीन महागडे फोन जबरदस्तीने घेवून निघुन गेले होते. आरोपींचा तांत्रिक साधणांच्या तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेवून त्यांना कोळेसवाडी, तिसगाव नाका, चक्की नाका परिसरातुन अटक केली असुन त्यांच्याकडुन 2.50 लाख किंमतीचे तीन फोन, एक देशी बनावटीचे पिस्टल (कटटा) व एक जिवंत काडतुस असा मुददेमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव ,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुहास हेमाडे , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक,जयपालसिंह गिरासे पोलीस निरीक्षक (का व सु), संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार,संजु मासाळ, विकास माळी,दिपक गडगे, निसार पिंजारी, पोलीस नाईक गणेश भोईर,प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे,रवि हासे, पोलीस शिपाई अशोक आहेरविजय आव्हाड, महेद्र मंझा, नाना चव्हाण, घनश्याम ठाकुर यांचे पथकाने केलेली आहे.