Dombivli Bangladeshi Women Arrested : डोंबिवलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक
Manpada Police Arrested Bangladeshi Women : मानपाडा पोलिसांना आपल्या पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
डोंबिवली :- मानपाडा पोलीस ठाणे Manpada Police Station हद्दीत भारतात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या तीन बांगलादेशी Dombivli Illegal Bangladeshi Women Arrested महिलांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाहीत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.उल्हासनगर गुन्हे-4 शाखेच्या Ulhasnagar Crime Branch Unit 4 पथकाने अटक केली आहे.
मानपाडा पोलिसांना आपल्या पोलीस ठाणे हद्दीत कृष्णा मंदिराच्या मागे कोळेगाव डोंबिवली पूर्व या ठिकाणी बांगलादेशी तीन महिला राहत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा कक्ष-4, उल्हासनगर पोलीस हवालदार सुरेश जाधव मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खात्री केल्यावर त्यांना तीन बांगलादेशी राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तीन महिला बांगलादेशींना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठीचे पारपत्र, व्हिसा आणि नागरिकत्व कागदपत्रांची मागणी केली असता पोलिसांना ते एकही कागदपत्र देऊ शकले नाहीत. रोजिना बेगम सुकूर अली, (वय 29),तंजिला खातून रज्जाक शेख, (वय 22),शेफाली बेगम मुनीरूल शेख, (वय 23) या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तीनही बांग्लादेशी महिलांविरुध्द मानपाडा पोलीस ठाणे येथे पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13,14 (अ) (ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाई मानपाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथक
अमरसिंग जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- 1) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रविण खोचरे, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, शेखर भावेकर, महिला पोलीस नाईक कुसूम शिंदे, महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे, विक्रम पाटील, प्रसाद तोंडलीकर सर्व नेमणूक गुन्हे शाखा, घटक-4 उल्हासनगर यांनी केलेली आहे.