dombivli crime news minor boy kidnapped and knife attacked by four youths : विवादातून रोष वाढला, सुनीलनगरच्या तरुणांनी भोपर रस्त्यावर नेऊन बेदम मारहाण
डोंबिवली – पूर्वीच्या किरकोळ वादातून उफाळून आलेल्या रोषातून चार तरुणांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. भोपर रस्त्यालगत निर्जन ठिकाणी या मुलाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले असून, हल्लेखोरांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास तक्रारदार मुलगा खासगी शिकवणीसाठी गेला असताना पाणी प्यायचे कारण सांगून बाहेर येताच आधीपासून पाळत ठेवणाऱ्या चार तरुणांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये ओढले. बचावासाठी मुलाने आरडाओरड केली, मात्र कोणी मदतीला धावले नाही.
सुनीलनगर परिसरातील दोन सुस्थितीत घरातील तरुण व इतर दोन साथीदारांनी भोपर रस्त्याजवळील अंधाऱ्या भागात नेत त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी व चाकूने हल्ला केला. ‘पुन्हा आमच्या वाटेला आलास तर तुझ्या वडिलांनाही सोडणार नाही’ असा इशारा देत आरोपींनी त्याला पुन्हा मोटारीत बसवून मानपाडा रस्त्यावरील डी मार्टजवळ सोडले आणि पळ काढला.
रक्तबंबाळ अवस्थेत घरी परतलेल्या मुलाने सर्व प्रकार घरच्यांना सांगितल्यावर पालकांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. सुनीलनगरमधील प्रमुख आरोपीसह इतर तिघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश भाबड करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…