Doctor Suicide News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नवविवाहित डॉक्टरने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे.
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 वर्षीय नवविवाहित डॉक्टरने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. Doctor Suicide मृत्यूपूर्वी डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी एक सुसाईड नोट टाकली असून, त्यामध्ये तिने पतीला आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध हुंड्यासाठी मृत्यू आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे.
डॉ. प्रतीक्षा भुसारे हिचा विवाह अवघ्या 5 महिन्यांपूर्वी झाला होता. त्या छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा भुसारे हिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने सात पानी सुसाईड नोटही सोडली आहे, ज्यामध्ये तिने पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे आणि या घटनेसाठी त्याला जबाबदार धरले आहे.अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध हुंडाबळी मृत्यू आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तिच्या सात पानी सुसाईड नोटमध्ये डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी लिहिले आहे की, तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावायचा आणि तिचे फोन कॉल रेकॉर्ड आणि मेसेजही तपासायचा. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी तुझ्यासाठी स्वत:ला विसरले आणि तू माझ्यासारख्या हसतमुख मुलीला पीडित आणि कमकुवत केलेस. तू स्वावलंबी, महत्वाकांक्षी मुलीवर अवलंबून आहेस.”
दोघांनी यावर्षी 27 मार्च रोजी लग्न केले. मृत डॉक्टरच्या वडिलांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीच्या आरोपी पतीने रशियातून एमबीबीएस केले होते आणि त्याला स्वतःचे हॉस्पिटल उघडायचे होते. यामुळे तो आपल्या मुलीवर आई-वडिलांकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत असे. सध्या पोलिसांनी मृत डॉक्टरच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…