क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Crime News : चालत्या ट्रेनमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला, चार दिवसांत दुसरी घटना; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Mumbai Latest Crime News : एलटीटी–नांदेड स्पेशलमध्ये लुटीचा प्रयत्न; डॉक्टरांचा हात तुटला

मुंबई‌ | नांदेडला जाणाऱ्या एलटीटी–नांदेड विशेष ट्रेनमध्ये बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एक भयंकर घटना घडली. एका अनोळखी चोरट्याने डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करून त्यांना ट्रेनमधून खाली फेकले. या घटनेत डॉ. योगेश देशमुख यांचा डावा हात तुटला असून, त्यांची पत्नी डॉ. दिपाली देशमुख गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पनवेलमध्ये राहणारे आणि कामोठे येथे ‘सदगुरू कृपा आयुर्वेद रुग्णालय’ चालवणारे डॉ. योगेश (50 वय) व डॉ. दिपाली देशमुख (44 वय ) हे दाम्पत्य त्यांची 9 वर्षांची मुलगी श्रद्धा समवेत नांदेडला नातेवाइकांकडे जात होते. त्यांनी मध्यरात्री 1 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून एलटीटी–नांदेड स्पेशल पकडली. तिघे एस-4 बोगीत होते. पहाटे 3.30 च्या सुमारास एक अनोळखी इसम बोगीत शिरला आणि दिपाली देशमुख यांची पर्स खेचण्याचा प्रयत्न करू लागला.

दिपाली यांनी जोरदार प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांना जबरदस्तीने ट्रेनमधून खाली खेचले. हा धक्का पाहून वरच्या बर्थवर झोपलेले डॉ. योगेश देशमुख खाली उडी मारून पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तेही खाली पडले. यात त्यांचा डावा हात तुटला.

घटनेनंतर तातडीने रेल्वे पोलिसांना कळवण्यात आले. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात कलम 309(4) आणि 309(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष पोलिस पथक शोधासाठी तयार करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ही चार दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी 2 जून रोजी अंधेरीजवळ जयपूर–वांद्रे एक्स्प्रेसमध्ये चार अज्ञातांनी एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत लुटले होते. त्यांच्याकडून 7 लाखांची बॅग पळवण्यात आली होती. त्या प्रकरणीही अजून आरोपी फरारच आहेत.

या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रेल्वेमध्ये सुरक्षेची हमी देणं हे यंत्रणेचं कर्तव्य आहे, अशी प्रवाशांची जोरदार मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0