Doctor Bribe News: किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी डॉक्टराने कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्याकडून मागितली लाच…
Anti Corruption Bureau Arrested Doctor For 3 Thousand Bribe : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांची कारवाई ; डॉक्टर पेशाला काळिंबा फासणारी घटना, कंत्राटी आरोग्य अधिकारी याची रजा मंजूर करण्यासाठी मागितली तीन हजार रुपयाची लाच, डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकला
धाराशिव :- प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर नितीन कालिदास गुंड (32 वर्ष) याला लाचलुपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव Anti Corruption Bureau Dharashiv यांनी अटक केली आहे. किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी यांच्याकडून तीन हजार रुपयाची 3 Thousand Bribe लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
तक्रारदार हा कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नोकरीस आहे. त्याचे पगार, वैद्यकीय रजा,किरकोळ रजा व इतर अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे सर्व अधिकार वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुंड यांना आहे. तक्रारदार कंत्राटी अधिकारी याला दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी तसेच रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे डॉक्टरने तीन हजार रुपयाची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना पंचासमक्ष डॉक्टरला ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच डॉक्टरच्या विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव विकास राठोड यांच्याकडून करण्यात येत आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा पर्यवेक्षण सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी -विकास राठोड, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव सापळा पथक पोलीस अंमलदार इप्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांनी सापळा रचून लाचखोर डॉक्टरला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News