धाराशिव
ज्ञानोबा लकडे यांचे निधन
कळंब(प्रतिनिधी )- दि.२६ तालुक्यातील सौदणा अंबा येथील जेष्ठ नागरिक ज्ञानोबा रघुनाथ लकडे यांचे वयाच्या ९२ वर्षी बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे यांचे वडील होत. त्यांच्यावर सौदणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार विक्रम काळे, डॉ नरेंद्र काळे, अनिल काळे, पत्रकार रणजित खंदारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांना त्यांचा मुलगा बालाजी लकडे यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे शुक्रवारी रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.