मुंबई :- दिवाळीच्या सणामधील दिवाळी पाडवा Diwali Padwa हा यंदा 2 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नव्या आणि शुभ कार्यांची सुरूवात केली जाते. व्यापारी वर्ग नव्या वर्षाची सुरूवात या दिवसाचं औचित्य साधून करत असतात. दिवाळी हा सण भारतात सर्वत्र धूमधडाक्यात साजरा होत असला तरीही त्याच्याशी निगडीत परंपरा या प्रत्येक भागात वेगवेगळ्या आहेत त्यामुळे सणासोबत सेलिब्रेशनही बदलते. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
•आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
- धनाचा होवो वर्षाव
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी
होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा… - बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा.. - उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! - ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा - आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा… - नवा सुगंध नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!