मुंबई

Diwali 2025 : आज ‘नरक चतुर्दशी’; अभ्यंग स्नान आणि दीपोत्सवाने स्वागत

•’छोटी दिवाळी’चा उत्साह: श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून मिळवलेल्या विजयाचा दिवस; नकारात्मकतेचा नाश करण्याची परंपरा

मुंबई :- दिवाळीच्या पाच दिवसांच्या मंगलमय उत्सवातील दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, ज्याला ‘छोटी दिवाळी’ किंवा ‘रूप चतुर्दशी’ म्हणूनही ओळखले जाते. आज (20 ऑक्टोबर 2025) सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी पहाटे लवकर उठून सुवासिक उटणे लावून अभ्यंग स्नान करण्याची विशेष परंपरा आहे, ज्यामुळे नरकरूपी दुःखाचा नाश होतो, अशी मान्यता आहे.

नरक चतुर्दशीचे महत्त्व

पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुर राक्षसाचा वध करून सोळा हजार एकशे कन्यांची सुटका केली. त्यामुळे वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय झाल्याचा हा दिवस आहे. म्हणून, नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील दुःखरूपी आणि दुर्गुणरूपी नरकासुराचा नाश व्हावा, अशी कामना केली जाते.

आजच्या दिवशी घरामध्ये दीपोत्सव साजरा करण्याची आणि यमराजाच्या नावाने दिवा लावण्याचीही प्रथा आहे, ज्यामुळे अकाली मृत्यूचे भय दूर होते, अशी श्रद्धा आहे. घरामध्ये आणि विशेषतः देवाऱ्यात दिवे लावून सकारात्मकतेचे स्वागत केले जाते.

नरक चतुर्दशीच्या या मंगलमय दिवशी आपल्या प्रियजनांना आणि मित्रमंडळींना पाठवण्यासाठी खालील खास शुभेच्छा संदेश:

नरक चतुर्दशी आणि दिवाळी पहाटच्या हार्दिक शुभेच्छा

1.श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा केला नाश, तसाच तुमच्या सर्व दुःखांचा होवो विनाश. नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

2.उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट. नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!

3.दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा, दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा. मन:पूर्वक शुभेच्छा!

4.नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारात्मकता. नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!

5.नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला, अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला. तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

6.आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो! नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

7.लक्ष दिव्यांनी उजळली निशा, घेऊन नवी उमेद, नवी आशा. होवोत पूर्ण मनातील सर्व इच्छा. नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा!

8.सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा, अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो! ही दिवाळी सुख-समृद्धीची जावो!

9.नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर आयुष्यात आपुल्या, नवचैतन्याचे नवकिरण येवो तुमच्या दारी. शुभ दीपावली!

10.आजच्या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा. नरक चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0