Bollywood actor Dino Morea poses for a photograph as he attends a screening of her upcoming Indian film 'Kesari Chapter 2' in Mumbai on April 17, 2025. (Photo by SUJIT JAISWAL / AFP)
Dino Morea Latest News : आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय डिनो मोरियाचे आर्थिक व्यवहार तपासणीच्या केंद्रबिंदूवर
मुंबई | मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कंत्राटात झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया Dino Moreahh याला गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तो सकाळी 11 च्या सुमारास मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचला. या प्रकरणात डिनोसह आठ संशयित व्यक्तींना समन्स बजावण्यात आले होते.
या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने याआधी मुंबई व कोचीसह 15 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये डिनो मोरियाच्या वांद्रे येथील घराचाही समावेश होता. डिनो मोरिया हा युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो, यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळातही मोठे लक्ष लागले आहे.
डिनो मोरिया आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी केतन कदम यांच्यात 2019 ते 2022 या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाले होते. त्यांची 25 वर्षांहून अधिक ओळख असल्याने या व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. याआधी मुंबई पोलिसांनीही डिनो मोरियासह त्याच्या भावाचीही चौकशी केली होती. आता ईडी त्याच आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने तपास करत आहे.
या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, मुंबई महापालिकेला तब्बल ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांचे संचालक आरोपी आहेत.
या सर्वांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 406,409,420,465,467,468,471 व 120(ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये पालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि निवृत्त अभियंते तायशेट्टे यांचा समावेश आहे.
तसेच, ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांशी संबंधित दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरोधातही गुन्हे दाखल आहेत. यामधील काहीजण मध्यस्थीची भूमिका बजावत होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…