Dinesh Pardeshi Joins Shiv Sena UBT : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश, उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार केला हल्ला
मुंबई :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी Dinesh Pardeshi Joins Shiv Sena ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन मानले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना त्यांचा उल्लेख “बाजारबुणगे” असे केला आहे.
डॉक्टर दिनेश परदेशी मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यांनी आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे वैजापूर वैजापूर विधानसभा क्षेत्रातून दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळणार का अशी चर्चा यावेळी रंगले आहे. या मतदारसंघातून दिनेश परदेशी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे ठाकरे इच्छा पूर्ण करणार का हे पाहावे लागेल. Vidhan Sabha Election 2024
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. मी गेल्या आठवड्यात वैजापूरला येऊन गेलो. त्याचवेळी तुमची आमच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा होती. पण त्यावेळी तो प्रवेश झाला नाही. पण आता तुमचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही भाजपतून इकडे आलात. त्यामुळे माझा भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना प्रश्न आहे की, भाजपमध्ये ज्या पद्धतीने भेसळीचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो तुम्हाला मान्य आहे का? सध्या हिंदुत्त्वाच्या नावाखाली जे थोतांड माजवण्यात येत आहे, ते हिंदुत्त्व माझे नाही, असे ते म्हणाले. Vidhan Sabha Election 2024
काल महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले. त्यांनी आम्हाला संपवण्याची भाषा केली. त्यांचे भाषण मी ऐकले नाही. पण या बाजारबुणग्यांना हा महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचा आहे. हा महाराष्ट्र विरांचा आहे हे त्यांना माहिती नाही. त्यांनी महाराष्ट्रात येऊन दाखवावे. त्यानंतर महाराष्ट्र कुणाला संपवतो हे आम्ही दाखवतो. माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे. पण आताच फार काही बोलणार नाही. प्रचार सुरू झाला की सर्वकाही पुढे येईल, असेही उद्धव ठाकरे यावेळी अमित शहा यांना आव्हान देण्याच्या सुरात म्हणाले. Vidhan Sabha Election 2024