Dilip Walse Patil : मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर औध रुग्णालयात उपचार
•Dilip Walse Patil in Hospital मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल प्रकृती ठीक
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बडे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत एक अतिशय अनपेक्षित अशी बातमी समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात असताना पाय घसरुन पडले. त्यांना या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वळसे पाटील यांना तसा कोणताही धोका नाहीय. ते लवकरच बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे. Dilip Walse Patil
दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. उपचाराला इतके दिवल लागतील हे पाहता त्यांना दुखापत गंभीर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पण ते लवकर बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटील हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री देखील होते. तसेच त्यांची पुणे जिल्ह्यात चांगली ताकद आहेत. ते आंबेगावात तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात चिंतेचं वातावरण आहे. त्यांच्या समर्थकांकडून वळसे पाटील लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली जात आहे. Dilip Walse Patil