Dilip Mohite Patil : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
पुणे :- पुणे-नाशिक महामार्गावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ओम सुनील भालेराव असे त्याचे नाव आहे. अन्य तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी मंचर पोलिसांनी Pune Manchar Police गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तो दारु पित नाही..; आ.दिलीप मोहिते पाटील
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण देताना त्यांचा पुतण्या मयूर मोहिते अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला नसल्याचा दावा केला आहे. घटनेच्या वेळी आपल्या पुतण्याने कोणत्याही प्रकारचे नशेचे सेवन केले नसल्याचा दावाही आमदाराने केला आहे. Pune Car Accident
पुण्यातील पोर्श दुर्घटनेनंतर पुण्यातून दुसरा अपघात समोर आला आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने त्यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. घटना घडली त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदाराचा पुतण्या दारूच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दारूच्या नशेत त्याने दुचाकीस्वारांना धडक दिली. मयूर मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) यांच्या वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Pune Car Accident
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…