Dharyasheel Patil : राज्यसभेकरिता भाजपकडून एक उमेदवार निश्चित, दुसरी जागा अजित पवार का? शिंदे?
Dharyasheel Patil nominated for Rajya Sabha from Maharashtra BJP : महाराष्ट्रातील दोन जागांपैकी एक जागा भाजपाने उमेदवार जाहीर केले
मुंबई :- राज्यसभेच्या रिक्त Rajya Sabha झालेल्या दोन जागांवर भाजप उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महायुतीमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपकडे एक जागा मागितली आहे. त्यानुसार राज्यसभेची एक जागा आता अजित पवार यांना सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकाच नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार कोणाला राज्यसभेची उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने धैर्यशील पाटील Dharyasheel Patil यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धैर्यशील पाटील हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. दक्षिण रायगड जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आता त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांची वर्णी थेट राज्यसभेवर लावली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून भाजपचे धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील हे भाजपचे राज्यसभेचे उमेदवार असतील. धैर्यशील पाटील हे शेकापमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली होती. मात्र, महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे त्यांनी पक्षादेश मानत माघार घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कोकण आणि मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून धैर्यशील पाटील यांना देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत बोलले जात आहे.
राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले किरण चौधरी हे हरियाणातून पक्षाचे उमेदवार असतील. तर केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना राजस्थानमधून तर जॉर्ज कुरियन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे.