Dharshiv Anti Corruption Bureau : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशीव यांची धडक कारवाई ; निवृत्तीवेतन शाखाच्या लेखा लिपिकला अटक
Dharshiv Anti Corruption Bureau News : सेवानिवृत्त पोलिसांकडून लेखा लिपिकने मागितले तीन हजार रुपयाची लाच, लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या ताब्यात
धाराशिव :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशीव Dharshiv Anti Corruption Bureau यांनी जिल्हा कोषागार कार्यालय, धाराशीव येथील लेखा लिपिक पदावर काम करणाऱ्या अनंता सखाराम कानडे (29 वर्ष) यांना तीन हजाराची लाच स्वीकारताना लाजलोचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau रंगेहात अटक केली आहे. सेवानिवृत्ती पोलीस हवालदार यांना मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल कोषागार कार्यालय धाराशीव येथे प्रलंबित होते आणि सदर बिल पास करण्याकरीता अनंत सखाराम कानडे लेखा लिपिक यांनी तीन हजार रुपये लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई
यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहेत.तक्रारदार यांचे सेवा निवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल कोषागार कार्यालय धाराशीव येथे प्रलंबित आहे. सदर बिलाची पडताळणी करून सदरचे बिल ऑडिट टेबलला पाठवण्यासाठी यातील आरोपी अनंता सखाराम कानडे (29 वर्ष) याने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष तीन हजार रुपयेची लाचमागणी करुन तीन हजार रुपयाची लाच रक्कम पंच साक्षीदारासमक्ष स्वतः स्वीकारली आहे .आरोपी कानडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध आनंदनगर पोलीस ठाणे, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे Maharashtra Latest Anti Corruption Bureau News
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव,सापळा अधिकारी नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव
पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य, आशिष पाटील यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. Maharashtra Latest Anti Corruption Bureau News
Web Title : Dharshiv Anti Corruption Bureau: Anti-corruption Department Dharshiv strike action; Accounts Clerk of Pension Branch Arrested