मुंबई

Dharma Rao Aatram On Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार लवकरच भाजप मध्ये जाणार अजित पवार गटाच्या नेत्याची गॅरंटी

•Dharma Rao Aatram claims Vijay Wadettiwar will soon joins BJP राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपा मध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांचे राईट हॅन्ड

मुंबई :- काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत. ते 100 टक्के भाजपात जातील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. आत्राम यांच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन विरोधकांच्या महाविकास आघाडीला हादरा दिला होता. या घटनांमुळे विरोधक हैरान झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा लवकरच भाजपत जाणार असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

विजय वडेट्टीवार 100 टक्के जाणार

विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत. वडेट्टीवार यांच्या गोटातील अनेक नेते भाजपमध्ये गेलेत. हे एक सूचक संकेत आहेत. त्यानुसार विजय वडेट्टीवार हे सुद्धा लवकरच भाजपमध्ये जाणार असून, ही 100 टक्के खरी गोष्ट आहे, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या काही बैठका झाल्या. चर्चाही झाली. त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाही तर उद्या विजय वडेट्टीवार निश्चितच भाजपमध्ये जातील. या बैठकांची अधिक माहिती मी देऊ शकत नाही. पण ते ही होते व मी ही होतो, एवढेच मी सांगेन. या सर्व चर्चा माझ्यापुढे झाल्या. खुद्द अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर आता विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहून करणार तरी काय? ते ही भाजपत जातील, असेही आत्राम म्हणाले.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts