Mumbai Dharavi Firing News : धारावी गोळीबार प्रकरणी ‘अज्जू’ला अटक, महिलेला लागलेली गोळी चुकून सुटल्याचे पोलिसांसमोर कबूल.
मुंबई :- मुंबईतील धारावी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात शाहू नगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगार मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (37 वय) याला अटक केली आहे. Mumbai Latest Firing News या गोळीबारात 32 वर्षीय सरवर बेगम शेख ही महिला जखमी झाली होती. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
रविवारी रात्री धारावीतील 90 फूट रोडवर खरेदी करत असताना सरवर बेगम शेख यांच्या हाताला गोळी लागली होती. पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि आरोपीच्या हालचालींचा माग काढत त्याला अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, महिलेला मारण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, तर बेकायदेशीर बंदूक हाताळताना चुकीने गोळी सुटली.
या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 109 (खुनाचा प्रयत्न) आणि भारतीय हत्यार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जूला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…