•धनाजी नामदेव पेठेपाटील, असे लाच स्वीकारणाऱ्या विद्यालयाच्या सचिवाचे नाव आहे
धाराशिव :- तुळजापूर येथील रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालय येथून एक खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यालयाच्या सचिवाला लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीने अटक केली आहे. एक लाख 55 हजार रुपयांचे लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर सचिवाला छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाराशिव युनिटने अटक केली आहे.
धनाजी ज्ञानदेव पेठेपाटील (55 वय) असे आरोपीचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालय, तुळजापूर, जि. धाराशीव. येथे कला शिक्षक या पदावर नोकरीस असुन त्यानी दिनांक 20 फेब्रुवारी 202रोजी स्वेच्छा सेवानिवृत्ती साठी अर्ज केला आहे. तक्रारदार यांचा स्वेच्छ सेवानिवृत्ती अर्ज मंजूर करण्यासाठी चा ठराव घेण्याकरिता यातील सचिव धनाजी पेठेपाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 1.55 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांचेकडून सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तसेच शाळेचे अध्यक्ष यांच्या समोर स्वतः स्विकारली असता त्यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर तुळजापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि धाराशीव. नानासाहेब कदम,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि धाराशीव,पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, जाकेर काझी, नागेश शेरकर, शशिकांत हजारे गेली कारवाई करत अटक केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…