Dharashiv Crime News : घरकुल हप्त्याचे बिल मंजूर करण्याकरिता पाच हजारांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला एसीबीच्या बेड्या
•घरकुल योजनेत अनुदान मंजूर दुसरा हप्त्याच्या बिल मंजूर होण्याकरिता बांधकामाचे फोटो पंचायत समितीला जमा करण्याकरिता पाच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी, (पंचायत समिती लोहारा) पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
धाराशिव :- पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजूर असलेल्या घराचे बांधकामाचे दुसऱ्या हप्त्याचे बिल मंजूर करण्याकरिता लाच घेणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी, पंचायत समिती लोहारा पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. लोहारा पंचायत समितीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
निखिल लिंबराज मस्के (28 वय) अशी अटक करण्यात आलेल्या कंत्राटी अभियंत्याचचे नावे आहे. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये सोमवारी (2 डिसेंबर) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांचे मंजूर घरकुलाचे दुसऱ्या हप्त्याचे बिल 45 हजार रुपये मंजूर होण्याकरिता बांधकामाचे फोटो व त्याबाबत ऑनलाईन रिपोर्ट पंचायत समिती लोहारा येथे जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रार यांचेकडे पाच हजारांची रूपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता मस्के यास ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर. मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर,सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी-विकास राठोड,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट,पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी, दत्तात्रय करडे यांनी केले आहे.